मित्रांनो पुण्यामध्ये जो येतो तो नक्कीच शनिवार वाड्याला भेट देतो, म्हणजे हा वाडा कोणाला माहित नाही असं होणारच नाही.
कारण हा वाडा पुण्याच्या संकृतीची शान आहे,फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक.
एकेकाळी “सात मजली कलसी बंगला” असं शनिवार वाड्याचं वर्णन केलं जायचं.
इथं बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला,आणि मराठयांचा साम्राज्याचा झेंडा अटकेपार म्हणजे दिल्लीपर्यंत रोवला